खंबाटकी घाटातील नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

06 Jul 2022 20:07:13
khambataki ghat
 
 
नवी दिल्ली : पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे.
 
 
खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश आज श्री गडकरी यांनी केला आहे. यानुसार पुणे - सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर सद्या प्रत्येकी ३ मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे कार्य सुरु असून इंग्रजीवर्णाक्षर 'एस' प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी घट होईल.
 
 
पुणे - सातारा आणि सातारा - पुणे कडील प्रवासाठी या बोगद्यातून लागणारा प्रत्येकी ४५ मिनीटे आणि १० ते १५ मिनिटांच्या वेळेत घट होवून केवळ ५ ते १० मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. ६.४३ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे ९२६ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0