लालु प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली भेट

06 Jul 2022 17:57:46

 

LALU PRASAD YADAV
 
 
नवी दिल्ली / पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवार, दि. ५ जून रोजी सांयकाळी विमानाने दिल्लीला हलविण्यात आले. लालू प्रसाद यादव यांच्यावर पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार सुरू होते. लालूंच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही विचारपुस केली.
 
 
 
"बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजद प्रमुख, लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृती स्वास्थासाठी जनता प्रार्थना करत आहे. त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते व कार्यकत्यांनी रुग्णालयात भेट दिली. लालूंची प्रकृती स्थिर असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुणीही रुग्णालयात भेटण्यासाठी येऊ नये, यामुळे इतर रुग्णांना त्रास होतो आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो," असे तेजस्वी यादव यांनी आवाहन केले आहे.
 
 
चारा घोटाळा प्रकरणात दोषी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सध्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. राबरीतील निवासस्थानी लालूंनी काही दिवसांपुर्वी शिडीवरुन पडल्याने जखमी झाले. या घटनेत लालुंच्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असुन प्राथमिक तपासात उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर लालूंनी घरीच आराम केला. त्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0