'खतरों के खिलाडी १२' मध्ये स्पर्धकांचा सामना हिंस्त्र प्राण्यांशी!

स्पर्धक-तरस आमनेसामने!

    06-Jul-2022
Total Views |

kkk
 
 
 
 
 
मुंबई : 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाच्या नावातूनच लक्षात येते की या शो मध्ये विविध आव्हानात्मक, धोकादायक खेळांचा समावेश असतो. आणि प्रत्येक नव्या सिझन मध्ये धोक्याची पातळी वाढवली जाते. असेच यंदाच्या 'खतरों के खिलाडी १२' या सिझनमध्ये यंदा धोक्यांची पातळीत अधिक वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडपासून स्पर्धकांना अवघड स्टंट्सशी सामना करावा लागत आहे. मात्र आता कार्यक्रमाच्या येणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये भयानक स्टंट होणार आहे. जे पाहून प्रेक्षक अधिक थक्क होणार आहेत.
 
 
 
 
 
आगामी एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एका स्टंटमध्ये कनिका मानचा सामना एका हिंस्त्र तरसाशी होत आहे. या प्रोमोत रोहित शेट्टी म्हणतो, 'तुम्हाला दिसतो का हा तरस? जेव्हा हे सर्व झुंडीने येतात तेव्हा सिंहसुद्धा पळून जातो.' रोहित शेट्टी कनिका मानला म्हणतो, 'पिंजऱ्यात तरस तुझ्याबरोबर राहतील.' हे ऐकून सर्वजणांना धक्का बसतो. हिंसक तरस पाहून कनिका मान मात्र ओरडून रडायला लागते. कनिकाचे ओरडणे ऐकून कोणालाही धक्का बसेल.
 
 
 
 
 
या प्रोमोमध्ये तुषार कालिया म्हणतात, 'पूर्ण पायच खाल्ला.' डाॅक्टर पुढे कनिका मानवर उपचार करताना दिसून येत आहेत. तिची अवस्था पाहून अनेक स्पर्धकांना रडू कोसळते. जन्नत जुबेर, राजीव अदातिया आणि रुबीना दिलैक हे देखील रडू लागतात. मग प्रश्न पडतो की खरचं तरसने कनिकाचा पायच खाल्ला का? त्यामुळे हे किती खरं किंवा खोटे हे एपिसोड पूर्ण पाहिल्यावरच कळू शकेल. प्रोमो व्हिडिओ समोर येताच अनेक नेटकऱ्यांनी कनिका मानची काळजी व्यक्त केली आहे. ती ठीक असेल अशी आशा व्यक्त करत आहेत. त्यामुळे 'खतरो के खिलाडी १२' चा या प्रोमोने प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. व्हिडिओत स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून आपण अंदाज बांधू शकतो की यावेळेस कार्यक्रमात धोक्याची पातळी किती भयानक असणार आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.