काली मातेचा अपमान सहन केला जाणार नाही!

06 Jul 2022 16:25:22

kalimaa
 
 
 
मध्य प्रदेश : लीना मणिमेकलाई 'काली' चित्रपटाच्या पोस्टरमुळे भारताच्या अनेक राज्यांत वादाची विषय ठरली आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील या वादाला चांगलाच पेट घेतला आहे. या प्रकरणावर तेथील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, 'या डोक्युमेंट्री फिल्म 'काली' मध्ये चक्क कालीमातेलाच सिगरेट ओढताना दाखवणे किती अपमानस्पद आहे! त्यामुळे याविरोधात तक्रार दाखल केली जाईल आणि हा चित्रपट मध्यप्रदेश मध्ये कसा बॅन करता येईल याचा विचार केला जाईल. काली मातेचा अपमान सहन केला जाणार नाही. शिवाय लवकरात लवकर हे पोस्टर बदलले नाही तर कडक कारवाई केली जाईल!'
 
 
 
 
 
त्यापुढे गृहमंत्री म्हणाले, 'मी दिग्दर्शक लीना मणिमेकलाईना विचारू इच्छितो की, आपण देवी-देवतांवर चित्रपट कशासाठी बनवतो? आणखी कोणत्या धर्माच्या देवतांवर चित्रपट काढण्याची हिम्मत आहे का! हे पोस्टर त्वरित हटवा, नाहीतर कारवाईस सामोरे जावे लागेल!'
 
 
 
 
 
 
 
लीना मणिमेकलाईने २ जुलैला तिच्या डॉक्यूमेंट्री फिल्म ‘काली’ चे पोस्टर ट्विटरवर रिलीज केले होते. त्या पोस्टरमध्ये एका स्त्री ला देवी कालीच्या रुपात दाखवले आहे ; तिच्या एका हातात त्रिशूळ, एका हातात LGBTQ चा सप्तरंगी ध्वज दाखवला आहे. एवढेच नाही तर ही काली मातेच्या रूपातील महिला चक्क सिगरेट ओढत आहे, असे या पोस्टर मध्ये दाखवले आहे. त्यामुळे पोस्टर रिलीज होताच सोशल मिडीयावर या चित्रपटाला चांगलाच विरोध केला जातोय.
 
 
 
 
 
 
या विरोधास प्रत्युत्तर देताना, दिग्दर्शक लीना मणिमेकलाई म्हणतेय, 'माझ्याकडे खायला अन्नही नाही आहे, परंतु, माझ्याकडे आवाज आहे! ज्यामुळे मी कोणत्याही भितीशिवाय बोलू शकते! आणि जर यासाठी मला माझ्या जिवाचीही पर्वा नाही.'
 
 
 
 
 
लीना मणिमेकलाईने २००२ साली शॉर्ट डॉक्यूमेंट्री ‘मथम्मा’ पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'काली' व्यतिरिक्त तिचे ‘सेंगडल’, ‘पराई’, ‘व्हाइट वैन स्टोरीज' हे चित्रपट देखील वादाचा विषय ठरले होते.
Powered By Sangraha 9.0