निर्मात्यांनी केला 'धाकड' च्या अपयशाचा खुलासा

    06-Jul-2022
Total Views |

dhakad
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. धाकडने कमाई देखील कशीबशी केली. एवढेच नाही तर काही सिनेमागृहात प्रेक्षक आले नाहीत म्हणून शो कॅन्सल देखील करावे लागले. आणि यामुळे धाकडचे निर्माते दिपक मुकुट यांना कर्ज फेडण्यासाठी ऑफिस विकावे लागले होते, असे सांगण्यात येत होते. या मुद्द्यावर स्वतः दीपक मुकुट यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
 
नुकत्याच एका मुलाखतीत 'धाकड' बॉक्सऑफिसवर फ्लॉप का झाला आणि सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला 'धाकड' ओटीटीवर प्रदर्शित करताना काय अडचणी आल्या यावर दीपक मुकुटने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपक मुकुट म्हणतात की, ''माझ्याबद्दल ज्या काही बातम्या कानावर पडल्या आहेत त्या केवळ अफवा आहेत. माझं नुकसान बऱ्यापैकी भरुन निघालं आहे आणि जे काही बाकी आहे ते मी पुढील सिनेमात वसूल करेन''.
 
 
 
 
पुढे ते म्हणतात, ''धाकड हा चित्रपट आम्ही खूप विचार करून बनवलेला आहे. कुठे कमी पडलो याचा विचार करत आहोत . मला माहित आहे, प्रत्येकाची आपली आवड असते त्यामुळे त्यांना जे आवडतं ते उचलून धरतात आणि जे नाही आवडत त्याच्याकडे पाठ फिरवतात. पण आम्हाला आनंद आहे की आम्ही स्पाय थ्रीलर सिनेमा स्त्री केंद्रातून बनवला; शिवाय असा जॉनर चित्रपटात बराच कमी आणला जातो.''
सुरुवाती पासूनच 'धाकड'ला बॉक्सऑफिसवर कमी प्रतिसाद मिळाला. ओपनिंग डे ला सिनेमाने फक्त ५० लाखांचा बिझनेस केला. त्यानंतर कंगना रनौतने स्वतःला या सिनेमाच्या अपयशातून अलगद बाजूला केले. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घईनी केले होते. २० मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात शाश्वत चॅटर्जी, अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता हे महत्त्वाच्या भूमिकेत होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.