'स्पाइसजेट' विमानाचे अचानक कराचीत लँडिंग

इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यानंतर स्पाइसजेटचे विमान कराची विमानतळावर उतरले

    05-Jul-2022
Total Views |
Spice
 
 
 
 
 
 
 
मुंबई: स्पाइसजेट बी-७३७ विमान ऑपरेटिंग फ्लाइट एसजी-११ (दिल्ली - दुबई) हे विमान मंगळवार दि. ५ रोजी इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आले. विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्याचे स्पाइसजेटने सांगितले. प्रवाशांना दुबईला घेऊन जाण्यासाठी एक बदली विमान पाठवण्यात येणार आहे.
इंडिकेटर लाईटमध्ये बिघाड झाल्यानंतर स्पाइसजेटच्या विमानाने मंगळवारी दि. ५ रोजी पाकिस्तानच्या कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर "सामान्य लँडिंग" केले. दिल्ली ते दुबईला जाणारे विमान कराची विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि कोणतीही आणीबाणी घोषित करण्यात आली नाही, असे स्पाइसजेटने सांगितले. हे विमान दिल्ली ते दुबई चाललेले होते. मात्र, इंडिकेटर लाईट खराब झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आले.



विमान कराची येथे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. कोणतीही आणीबाणी घोषित करण्यात आली नाही आणि विमानाने सामान्य लँडिंग केले,” स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले. विमानात काही बिघाड झाल्याचा कोणताही अहवाल यापूर्वी आलेला नाही. प्रवाशांना अल्पोपहार देण्यात आला आहे, प्रवाशांना दुबईला घेऊन जाण्यासाठी एक बदली विमान पाठवण्यात येणार आहे, असे 'स्पाइसजेट'च्या प्रवक्त्याने सांगितले.


 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.