मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

05 Jul 2022 17:38:58
CM
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दि. ५ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्वातंत्र्यवीरसावरकर दालनास सदिच्छा भेट दिली. या दरम्यान त्यांनी तेथील संग्रहित बाबींची माहिती घेतली. तसेच त्यांच्या जीवनचरित्राशी संबंधित विविध छायाचित्रांची पाहणी केली.
 
 
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीरसावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मंगळवारी दि. ५ रोजी दुपारी, मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्वातंत्र्यवीरसावरकर दालनात दाखल झाले. त्यांनी तेथील संग्रहित बाबींची माहिती घेतली. तसेच त्यांच्या जीवनचरित्राशी संबंधित विविध छायाचित्रांची पाहणी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीव प्रेरणा आणि उर्जा देणारे आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवनपटावर आधारित साहित्य, सावरकरांची अर्धाकृती मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते.
 
 
तत्पूर्वी कोकणासह इतर भागातील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. विविध जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ११ टीम तैनात आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज आहेत.
Powered By Sangraha 9.0