बिग बॉस ओटीटी २ चे होस्ट कोण?

    05-Jul-2022
Total Views |


bigboss 
 
 
 
 
 
मुंबई : बिग बॉसचा प्रत्येक सिझन नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असतो. त्यामुळेच बिग बॉसचे ओटीटी व्हर्जनसुद्धा आणण्यात आले, ज्याला लोकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. हे ओटीटी व्हर्जन vootवर प्रदर्शित केले गेले. हा शो बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने होस्ट केला होता.
 
 
 
 
 
आता या शोच्या नव्या सीझनची तयारी सुरु झाल्याचे समजत आहे. पण आता करण जोहर नाही तर हिना खान या शो ची होस्ट असणार आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप आनंदी आहेत. त्यामुळे आता संपूर्ण टीम हा शो हिट करण्याच्या हेतूने निर्मात्यांनी कंबर कसली आहे. पण हिना खान चे नाव चर्चेत असताना काही जण म्हणत आहेत, हा शो रणवीर सिंग होस्ट करत आहे. नक्की बिग बॉस चे होस्ट कोण असणार हे अजून स्पष्ट होत नाही आहे. खरेतर याआधी रणवीरने छोट्या पडद्यावर 'द बिग पिक्चर' नावाचा आणखी एक रिअॅलिटी शो होस्ट केला होता.
 
 
 
पण रणवीर सुद्धा आता आधीच्या कमिटमेंट्समुळे व्यग्र आहे असे समजत आहे. म्हणून निर्मात्यांनी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांना शो च्या निवेदनासाठी विचारणा केली आहे. हे दोघे या आधी कंगनाच्या 'लॉकअप' शो मध्ये काही भाग जेलरच्या रुपात होस्ट केला होता, ज्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यांना विचारणा झाली असली तरी त्यांनी यावर होकार कळवल्याची बातमी अद्याप तरी समोर आली नाही.
 
 
 
 
 
बिग बॉस ओटीटी च्या दुसऱ्या सिझनसाठी निर्मात्यांनी सेलेब्सना ऑफर देत आहेत. असे म्हटले जात आहे की कांची सिंग, पूजा गौर आणि महेश शेट्टी या बिग बॉस ओटीटी शो मध्ये सामिल होण्यास तयार होऊ शकतात. याशिवाय निर्मात्यांनी संभावना शेठ आणि पूनम पांडेशी देखील संपर्क साधला आहे. पण अद्याप या दोघींचाही शो साठी होकार आहे की नकार याविषयी काही बातमी समोर आलेली नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.