बकरी ईदला गाईंची कुर्बानी टाळा!

05 Jul 2022 12:47:57

id
 
 
नवी दिल्ली : “देशातील हिंदू समाज गाईला माता मानतो. त्यामुळे मुस्लीम समुदायाने येत्या बकरी ईदच्या दिवशी गाईची कुर्बानी टाळावी,” असे आवाहन ‘ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) वादग्रस्त खासदार आणि आसाम जमियत उलेमाचे प्रदेशाध्यक्ष मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी नुकतेच केले.
 
 
आसामधील खासदार आणि जमियत उलेमाचे प्रदेशाध्यक्ष मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी मुस्लीम समाजातील लोकांना बकरी ईदला गाईंची कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले आहे. अजमल म्हणाले की, हिंदू समाजातील लोक गाईंची पूजा करतात आणि तिला मातेप्रमाणे वागवतात.
 
 
मुस्लिमांना आवाहन करताना बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “भारत हा विविध धर्माच्या लोकांचा देश आहे. या देशातील बहुसंख्य लोक हिंदू असून ते गाईची पूजा करतात आणि गाईला माता मानतात. हिंदू समाजातील लोकांच्या भावना गाईशी निगडित आहेत. त्यामुळे येत्या बकरी ईदच्या दिवशी गाईंचा बळी देणे टाळावे,” असे आवाहन त्यांनी मुस्लीम समाजास केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0