अमरावती - उमेश कोल्हेंच्या हत्येचा सीसीटिव्ही फुटेज व्हायरल

नुपूर शर्मा समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल हत्या

    05-Jul-2022
Total Views |
amr
 
 
अमरावती : महाराष्ट्रातील अमरावतीच्या उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने हाती घेताच या भीषण हल्ल्याचे नवे तपशील समोर आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
 
सीसीटीव्ही फुटेजनुसार उमेश कोल्हेच्या मृत्यूपर्यंतचे क्षण अतिशय तपशिलवर दाखवतात. दि. २१ जून रोजी रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समजते. आणि ही घटना त्याच्या केमिस्ट दुकानापासून काही मीटर अंतरावर घडल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये आढळून आले आहे.
 
या क्लिपमध्ये तीन जण कोल्हे यांना पकडून घेताना दिसत आहेत. तर एका व्यक्तीने त्यांचा गळा चिरला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जात असताना कोल्हे जमिनीवर पडताना दिसत आहेत. त्याला जवळच्या इस्पितळात नेण्यासाठी लगेचच मदत पोहोचली, पण खूप उशीर झाला होता.


 
 
या प्रकरणातील सर्व सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयए अधिकारी आता या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. आणि अनेक कागदपत्रांचा अभ्यास करत आहेत. तपास यंत्रणा आरोपींना कोल्ही यांच्या दुकानाच्या आवारात आणि हल्ल्याच्या घटनास्थळाला लागून असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची योजना आखत असल्याचे कळते. गुन्ह्याचे स्पष्ट चित्र काढण्यासाठी एनआयए घटनास्थळांवर हत्येपर्यंतच्या घटना पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करेल. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे मानले जात असून, सुमारे सात दिवसांचे नियोजन त्यात होते. फुटेजमध्ये हल्लेखोर कोल्हेच्या प्रतीक्षेत थांबलेले दिसत आहेत.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.