मुंबई : शिंद सरकरने बहुमत सिद्ध करत विजयोन्मादाने पुढची अडीच वर्षे आपण स्थिर सरकार देणार यावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या क्षणीही उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला. इतके दिवस उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणाऱ्या संजय बांगर यांनी अखेरच्या क्षणी शिंदे सरकारला मतदान केले. १६४ मते मिळवून शिंदे सरकारने आपले बहुमत सिद्ध केले.
लोकसभेप्रमाणे शिरगणतीने मतदान पद्धतीने ही बहुमताची प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर विधानसभाअध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी प्रस्ताव मतदादानास ठेवण्यास परवानगी दिली आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करत शिंदे - फडणवीस सरकरने पुढच्या अडीच वर्षांसाठीचा आपल्या सरकरचा मार्ग मोकळा केला.