हृतिक आणि सैफचा 'विक्रमवेध' वादात? निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

04 Jul 2022 17:15:20
 
 
 
vikramvedha
 
 
 
 
 
मुंबई : सध्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा 'विक्रम वेध' हा एक चित्रपट आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत असतानाच आता एका नव्या वादाने तोंड वर केले आहे. माध्यमांतील सूत्रानुसार असे समजत आहे की, हृतिकने उत्तर प्रदेशात चित्रपटाच्या चित्रीकरणास नकार दिला. आणि त्याच्या सांगण्यानुसार टीमने यूएईमध्ये भारतीय राज्याचे प्रतिबिंब दिसणारे नेपथ्य तयार केले होते. रिलायन्स एंटरटेन्मेंट हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या सहनिर्मात्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहिर करून या वादाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
 
 
तर निर्माता कंपनीने आबूधाबीत चित्रीकरणाविषयी माहिती देत हे वृत्त दिशाभूल करणारे आहे असे म्हटले आहे. ते ट्विटरवर प्रसिद्धीपत्रक शेअर करत म्हणतात, की विक्रम वेधच्या चित्रीकरण स्थळाविषयी बऱ्याच दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की विक्रम वेधचे बहुतेक चित्रकरणाचा मोठा भाग लखनौत पूर्ण झाला आहे. चित्रपटाचा काही भाग संयुक्त अरब इमिरट्समध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ पासून चित्रीकरण करण्यात आले. हे फक्त एकच स्थळ होते जिथे मुलभूत सुविधा जसे की बायो बबल यासारख्या सोयी सुविधा होत्या.
 
 
 
 
त्यामुळे आरोग्य आणि प्रोटोकाॅलसाठी आम्ही याची निवड केली. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे चुकीच्या पद्धतीने पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्जनशील लोकांकडून आलेल्या सल्ल्याचा आम्हाला आनंदच होईल, त्यामुळे आम्ही स्वागतच करु! निर्मिती आणि पैशाबाबतचा निर्णय केंद्रीय पद्धतीने घेतले जातात, असे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0