एकाच वर्षात येतो दोन वेळा वाढदिवस - पंकज त्रिपाठी

    04-Jul-2022
Total Views |

trpathi
 
 




मुंबई : विविध चित्रपट आणि वेबसिरीज मधून प्रकाशझोतात आलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयामुळे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. खरेतर ज्या वयात लोक निवृत्तीकडे वळतात त्या वयात पंकज त्रिपाठी एकाहून एक भूमिका सुपरहीट करत आहेत. कलेला वय नसते त्यामुळे त्यांचे करिअर उशिरा सुरु झाले असले तरी त्यांनी कधीही धीर सोडला नाही. पंकज त्रिपाठींचे अनेक मजेशीर प्रसंग प्रसिद्ध आहेत. त्यातील एक त्यांनी नुकताच सांगितला आहे, तो त्यांच्या वाढदिवसाचा.

 
 
 
 

आपला वाढदिवस वर्षातून एकदाच येतो यात काही वाद नाही. परंतु पंकज त्रिपाठी आपल्या एका मुलाखतीत सांगतात, त्यांचा एकाच वर्षात एक वाढदिवस नव्हे तर दोन वेळा वाढदिवस येतो आणि तो ही सारख्याच महिन्यात.

 
 
 
 

पंकज त्रिपाठी म्हणतात, ' माझ्या एक नव्हे तर दोन जन्मतारखा आहेत. एक ५ सप्टेंबर तर दुसरी २८ सप्टेंबर . २८ सप्टेंबर ही खरी जन्मतारीख असली तरी अनेकजण पाच तारखेला शुभेच्छा देतात. या मागे एक मजेशीर किस्सा आहे. माझा भाऊ गावातल्या शाळेत माझी ऍडमिशन करायला गेला. त्याला जेव्हा शिक्षकांनी माझी जन्मतारीख विचारली तेव्हा त्याला नीटशी आठवत नव्हती, फक्त महिना काय तो लक्षात होता. तेव्हा शिक्षकांनी सुचवले की, आठवत नसेल तर पाच सप्टेंबर लिहून टाका. शिक्षक दिन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्यामुळे चांगला दिवस आहे. त्यामुळे हीच तारीख कायम झाली. माझ्या डॉक्युमेंटवर हीच तारीख आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टवर सुद्धा हीच तारीख आहे. काहींना ती तारीख बाहेरून कळली आणि त्यांनी त्या दिवशी शुभेच्छा द्यायला सुरवात केली. मीसुद्धा अजून गोंधळ नको म्हणून फार विचार न करता, स्पष्टीकरण न देता उत्तर देऊन टाकतो.'

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.