कर्नाटकच्या सिना शेट्टीने पटकावला 'फेमिना मिस इंडिया २०२२' चा किताब

    04-Jul-2022
Total Views |

sini
 
 
 
 
मुंबई : सिनेस्टार्सपासून ते अगदी सर्वसामन्यांपर्यंत 'मिस इंडिया' हा किताब कोण मिळवणार ही चर्चा रंगली असताना रविवारी ३ जुलै रोजी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि भारताला या वर्षीची नवी ब्युटी क्वीन मिळाली. कर्नाटकच्या सिनी शेट्टीने 'फेमिना मिस इंडिया' २०२२ चा किताब मिळवला आणि तिला मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये फेमिना 'मिस इंडिया वर्ल्ड'चा मानाचा मुकूट बहाल करण्यात आला. सिनी चा जन्म मुंबईचा असला तरी ती कर्नाटकात स्थायिक आहे. नुकतीच तिने अकाऊंट आणि फायनान्स या विषयात डिग्री घेतली आहे. त्याच्याच जोडीने भरनाट्यमचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील ती घेत आहे.
 
 
 
 
 
'मिस इंडिया वर्ल्ड २०२२' स्पर्धेत राजस्थानच्या रुबल शेखावनं फर्स्ट रनर अपचा किताब जिंकला आहे. रुबल राजस्थानच्या शाही घराण्यातून असल्याचे बोलले जात अहे. रुबल म्हणते की जिंकण्यापेक्षा आपली प्रगती खूप महत्त्वाची असते. आपला आत्मविश्वास दांडगा असल्याचे ती म्हणाली आहे. तिला नृत्य, अभिनय, चित्रकला या कलांमध्ये आवड असून, बॅडमिंटनही ती उत्तम खेळते. तर याचबरोबर या स्पर्धेत उत्तर प्रदेशची शिनाता चौहान सेंकेंड रनर अप ठरलेली आहे.
 
 
 
 
 
रविवारी संध्याकाळी 'फेमिना मिस इंडिया २०२२' च्या भव्य-दिव्य शो मध्ये ३० राज्यांच्या विजेत्यांनी परिक्षक आणि सर्वांसमोर आणण्यात आले. फॅशन डिझायनर अभिषेक शर्माच्या रिसॉर्ट वियर कलेक्शनने डिझाईन केलेले कपडे त्या सर्व सौंदर्यवतींनी परिधान केले होते. तर वीएलसीसी 'मिस इंडिया २०२२' चा ग्रॅंड फिनाले कलर्स एचडी वाहिनीवर १७ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ वाजता आपण पाहू शकता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.