मुंबई : सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. शिंदे सरकारची बहुमत चाचणी विश्वासदर्शक पार पडत असताना अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार वेळेत न पोहोचल्याने त्यांना सभागृहाबाहेरच राहावे लागले आहे. अनेक आमदारांची वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ सुरु असताना चव्हाण आणि वडेट्टीवार यांच्यासाठी सभागृहाचे दार बंद झाले होते.
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासोबत अण्णा बनसोडे, संग्राम जगताप सुद्धा सभागृहाबाहेर असल्याची माहिती आहे. तर, आदित्य ठाकरे देखील शेवटच्या क्षणी सभागृहात पोहोचले. काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाबाहेरच राहिले आहेत.विश्वासदर्शक ठरावासाठी दरवाजे बंद केल्यामुळे त्यांना वेळेत आत जाता आले नाही.