मुंबई : भारतात लोकप्रिय झालेल्या पब्जी गेम अॅपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. याविषयी गुगल आणि अॅपलला बॅटल रॉयल गेम बॅटलग्राउंड्स इंडिया म्हणजेच BGBI या गेमवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, अंतर्गत 69अ या कलमार्तंगत बंदी घालण्यात आली आहे.
क्राफ्टन या कोरियन गेम विकसन कंपनीने पब्जी हा गेम विकसित केला होता. या गेमवर भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्त बंदी घातली. BGBI या गेमच्या विरोधात प्रहार या सामाजिक संस्थेंने भारत सरकारला माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, अंतर्गत 69अ या कलमार्तंगत बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीवरुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
BGBI या गेमच्या विरोधात अनेक दिवसांपासुन तक्रारी येत होत्या. यामध्ये लहान मुलं गेम खेळताना पालकांचे केडीट कार्डचा वापर करत असल्याने, पालकांच्या बॅकेतील पैसे आणि खाजगी माहिती लिक होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली. तसेच अनेक तरुणांना जीव देखील गमवावा लागला आहे. पब्जी गेमवर बंदी घातल्यानंतर BGBI या गेमवर सुरक्षेच्यादृष्टीने अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण ते कार्यक्षम ठरले नाही.
गुगलने या गेम अॅपसह आणखी 50 अॅपवर देखील बंदी घातली आहे. फनी किबोर्ड, टेस्ट मॅसेजर, प्राव्हेट मॅसेजर या सारख्या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. या विषयी आधिकृत पत्रक देखील गुगलने जाहिर करण्यात आले आहे.