राहुल नार्वेकर ठरले सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष

03 Jul 2022 13:14:25
 
 
rahul
 
 
 
मुंबई : अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भाजपच्य राहुल नार्वेकर यांनी बाजी मारत शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा मान पटकावला. राहुल नार्वेकर हे फक्त महाराष्ट्रतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सरावात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनानंदाच्या भाषणात याचा उल्लेख केला. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांचे राहुल नार्वेकर हे जावई आहेत.
 
 
महाविकास आघाडीने शिवसेनेच्या राजन साळवी यांना उमेदवारी दिली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राहुल नार्वेकर १६४ मते मिळवून विजयी झाले. राजन साळवी यांना १०७ मते पडली. " महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची मोठी परंपरा आहे. यातील कित्येक अध्यक्षांनी देशपातळीवर नाव कमावल. अशा या पदावरून त्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून होईल अशी आम्हांला खात्री आहे " अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0