"मग वडिलांचे स्मारक जनतेच्या पैश्यांनी कशासाठी ?"

27 Jul 2022 15:46:01
 
atul
 
  
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचेच मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला हिम्मत असेल तर स्वतःच्या आईवडिलांचे नाव वापरून निवडणूक जिंकून दाखवा माझ्या वडिलांचे नाव कशासाठी वापरता असे आव्हान दिले होते. याच आव्हानाचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जबरदस्त समाचार घेतला आहे.
 
 
 
 
 
 
 
माझ्या वडिलांचे नाव वापरू नका असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या वडिलांचे स्मारक बांधायला जनतेच्या खिशातील पैसे कसा काय चालतो? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ते पाचशे कोटी स्वतःच्या खिशातून द्यावेत अशा शब्दांत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला जोरदार लक्ष्य केले होते. या मुलाखतीची खिल्ली उडवताना "मी फिक्स मॅच बघत नाही" असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0