मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयांमुळे, युपीएससीच्या विद्यार्थांना मिळणार दिलासा

27 Jul 2022 19:28:05
UPSC ekanath shinde
 
 
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या माध्यामातून देशातील प्रशासकीय अधिकार्यांeची नियुक्ती होत असते. राज्यातील अनेक मराठी तरुण ही परीक्षा देत असतात. अनेक जण दिल्लीला परीक्षेच्या तयारीसाठी जातात. परीक्षा देण्यार्याक विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेल्या काही खोल्या तसेच शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत 500 खोल्यांची स्वंतत्र इमारत बांधणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. दिल्लीत राहुन युपीएससीची तयारी करण्यार्या् विद्यार्थ्यांना मदत व्हावी, याकरीता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
 
 
युपीएससी परीक्षेची तयारी करण्यार्याघ विद्यार्थी आणि पालकांमध्ये, आपल्या शहरापासुन दुसर्या् शहरात जाऊन राहणे अव्हानात्मक असते. अशा विद्यार्थ्यांना दिल्लीत राहण्यासाठी अमाप खर्च करावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयांमुळे परीक्षेची तयारी करण्यार्याच विद्यार्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0