लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणार

27 Jul 2022 20:51:26
lonar
 
 
 
मुंबई: लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास करणारलोणार सरोवराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी जवळपास ३७० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास बुधवारी दि. २७ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच सर्व विभागांचे, सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.
 
 
या कामांची विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे केली जातील. या पूर्वी लोणार सरोवर आणि आसपास जंगलाला जून महिन्यात  वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. तसेच लोणारला धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्यातील दहा संवेदनशील वन्यजीव अधिवास 'धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास' घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला. दि. ६ जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या १८ व्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0