शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती

    26-Jul-2022
Total Views |
 

health 
 

 
रोगप्रवणस्थिती अभ्यासत असताना रोगप्रवृत्तकारक घटक जे आहेत, त्यांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा असतो, हे रोगप्रवृत्तकारक घटक आपण पाहिले, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया...
 
 
2) लिम्फेटीक डायथेसिस - लस प्रवृत्त कारक घटक-लहान मुलांमध्ये ही प्रवृत्ती दिसून येते, ही प्रवृत्ती आजाराचे मूळ कारण ज्याला आपण सोरा (Psora) असे म्हणतो, त्यापासूनच तयार झालेली असते, ही प्रवृत्ती लस व पेशीअंतर्गत स्राव यांच्याशी निगडित असते. त्यामुळे या प्रकारच्या रोगप्रवृत्तकारक घटकांमुळे सर्वप्रथम त्वचन तसेच श्लेमलत्वचा आणि शेवटी शरीरातील अवयव यांच्या आजाराचा अंतर्भाव होतो. खरूज, नायटे, त्वचेखाली पू होणे, एक्झीमा या प्रकारचे आजार आयुष्याच्या सुरुवातीला दिसून येतात. त्यानंतर जसे वय वाढू लागते तसे अ‍ॅलर्जी, सतत होणारा सर्दी-खोकला, दम लागणे, ब्रॉन्कायटीस, शरीराची वाढ खुंटणे हादेखील याच रोगप्रवृत्तकारक घटकाचा भाग असतो. त्यामुळे लहान मुले जी चालायला व बोलायला उशिरा शिकतात, त्यांच्या शरीरातही लसप्रवृत्तकारक घटक असतो. मुलाचे वजन न वाढणे, मुडदूस, स्नायूंमधील वेदना व सतत स्नायू आकुंचन पावणे हे या रोगप्रवृत्तकारक.
 
 
2) डीसक्रॅटीक डायथेसिस - या प्रकारच्या रोगप्रवृत्तकारक प्रकृतीमध्ये मेंदूचा समतोल बिघडतो, या प्रकृतीबद्दल अजूनही संशोधन चालू आहे.
 
 
परंतु, या प्रकारच्या रोगप्रवृत्तकारक स्थितीमुळे त्या माणसाला कर्करोग होऊ शकतो. तसेच शरीरामध्ये विविध ठिकाणी गाठी होऊ शकतात, तसेच रक्ताचा कर्करोगही होऊ शकतो. त्याचबरोबर या स्थितीमध्ये असलेला लोकांना मेंदू व त्याच्या नसांचे आजार होऊ शकतात. तसेच अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. त्यामुळेच या प्रकारच्या रोगप्रवृत्त स्थितीबद्दल वैद्दकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहे. या प्रकारच्या शरीरप्रकृतीमध्ये असे लक्षात आले आहे की, शरीराच्या पेशींमध्ये होणारे बदल सर्वप्रथम माणसाच्या विचारामध्ये व मेंदूमध्ये होणार्‍या बद्दलांनंतर होत असतात. त्यालाच Psychosomatic Disease (सायकोसोमॅटीक आजार) असे म्हटले जाते.
 
या प्रकारच्या स्थितीमुळे गंभीर प्रकृतीचे आजार तयार होत असतात. व त्यामुळेच या स्थितीला जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे संवेदनशील व अतिसंवेदनशील व्यक्तिमत्त्वामध्ये हे आजार तयार होणारी शक्यता जास्त असते, तसेच त्या लोकांची सर्वसाधारण ‘सस्पेटॅबिलिटी’ही कमकुवत असते, त्या लोकांमध्ये हे ‘सायकोसोपॅथिक’ आजार व पर्यायाने गंभीर आजार होण्याची शक्याता जास्त असते, आहारविहार आचार व विचार या गोष्टींचाही या आजार होण्यामागे फार मोठा हात असतो. म्हणूनच आपली जीवनशैली व विचारशैली बदलून आपण या प्रकृतीच्या आजारांपासून मुक्तता मिळवू शकतो, होमियोपॅथीने याचा फार सखोल अभ्यास करून ठेवला आहे व म्हणूनच अशा आजारांमध्ये होमियोपॅथी एक सक्षम उपचारपद्धती आहे.
 
 
 
- डॉ. मंदार पाटकर