पंतप्रधानांच्या बाजूला उभी असणारी 'ती' व्यक्ती आहे तरी कोण?

25 Jul 2022 16:20:44

Pratibhatai Patil
 
 
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या वनवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून सोमवारी (दि. २५ जुलै) द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये राष्ट्रपतीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रीमंडळ यांसह अनेक मंडळी उपस्थित होती. मात्र या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांच्या बाजूला उभी असणारी 'ती' व्यक्ती कोण होती? असा प्रश्न सुरुवातीला सोहळा पाहणाऱ्या प्रत्येकास पडला असणार. त्या आहेत भारताच्या माजी आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील! भारताला लाभलेल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देण्यासाठी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी शपथविधी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शविली होती.
 
  
प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २००७ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांना ओळख मिळाली होती. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राज्यपाल होत्या. तर द्रौपदी मुर्मू या मुळ ओडिशा राज्याच्या असून झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे, एवढंच नव्हे तर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
 
  
Powered By Sangraha 9.0