होणार कांदळवन रक्षकांचा सन्मान!

25 Jul 2022 19:40:41
Mangrove
 
 
 
 
 
मुंबई : किनाऱ्याचे रक्षक अशी ओळख असलेल्या कांदळवनांचे आणि संबंधित परीसंस्थेचे संवर्धन करणाऱ्या लोकांचा सन्मान कांदळवन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात मंगळवारी दि. २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात पर्यावरण रक्षण आणि जैवविविधता संवर्धन करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमास प्रधान सचिव, वने- वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक एन वासुदेवन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र वन विभागाच्या 'कांदळवन कक्षाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या दहा वर्षात कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांनी दहा गावांमध्ये निसर्ग पर्यटन गट स्थापन करून तेथील कांदळवनांबाबत स्थानिक लोकसहभागातून जन जागृती केली आहे. या मध्ये काळींजे, दिवेअगर, तारा-मुंब्री, मीठ-मुंब्री, आंजर्ले, वेलास, मारंबळपाडा या गावांचा समावेश आहे. तसेच ऐरोली आणि मारंबळपाडा येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता माहिती केंद्रांची उभारणी केली आहे.




Powered By Sangraha 9.0