ज्या गद्दारांना परत यायचं त्यांनी यावं : आदित्य ठाकरे

23 Jul 2022 14:03:00
news 1

छत्रपती संभाजी नगर : "कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करता येत नाही. छोटे छोटे गट पाडून सत्ता मिळवता येत नाही. आज सत्य जनतेसमोर आहे. कुणालाही महाराष्ट्रात गद्दारी केलेली आवडत नाही. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला जात आहे. सरकार प्रेमावर आणि जनमतावर तयार होतं. त्यामुळे सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.", असा टोला माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

"आम्ही एवढाच विचार करतोय आमचं चुकलं काय?, गद्दारी झाल्याचं दुःख नाही. आपल्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे दुःख आहे. आजही शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आमच्या पाठीशी ठाम उभा आहे. सत्ता सोडावी लागली याचं दुःख नाही. ज्या गद्दारांनी तिकडे जाऊन गद्दारी केली ज्यांना इकडे यायचं असेल त्यांनी यावं. ज्यांना यायचं नाही त्यांनी थोडं मन मोठं करुन आमदारकीचा राजीनामा द्या आणि जनतेतून निवडून या.", असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.


"मी ३२ वर्षांचा तरुण म्हणून हे राजकारण जेव्हा पाहतो आहे, तेव्हा तरुणांना कुठल्या तोंडाने सांगेन की, तुम्ही राजकारणात या. हे परिपक्व राजकारण नाही. मी आजही पुन्हा सांगतोयं. ज्यांना यायचं आहे त्यांनी खुशाल या. ज्यांना तिकडे रहायचं आहे. त्यांनी आनंदात रहा. पण निवडणूकीला सामोरे जाऊन पुन्हा एकदा निवडून या," असेही ते म्हणाले. 



महाविकास आघाडीचा प्रयोग भाजपच्या पाठीत खंजीर खुपसूनच 

आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाने गद्दारी केल्याचा कितीही दावा केला असला तरीही युतीच्या मतांवर निवडून येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आधीच्या सरकारमध्ये झाला. भाजप-शिवसेना युतीतून निवडून आलेल्या उमेदवारांना घेऊन राष्ट्रवादी-काँग्रेसशी आघाडी आधीच्या सरकारमध्ये झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हीच चूक सुधारण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचा खुलासा या माध्यमातून केला आहे. तसेच आपणच खरी शिवसेना असल्याचेही शिंदेंनी म्हटले आहे. ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता निवडणूक आयोग या प्रकरणाचा फैसला देणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस-शिंदे आणि शिवसेना यांच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे. 





Powered By Sangraha 9.0