"एका निष्ठांवंत शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी सुरक्षा नाकारली"

22 Jul 2022 11:35:02

suhas
 
 
मुंबई : दहशतवादी याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या अस्लम शेख आणि नवाब मलिक यांना झेड प्लस सुरक्षा देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये पण एकनाथ शिंदेंना जेव्हा नक्षलवाद्यांकडून जेव्हा मारण्याची धमकी दिली गेली होती, तेव्हा त्यांना मात्र झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली होती असा आरोप मनमाडचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.या धमक्यांच्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते.
 
 
 
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देणार येऊ नये असे सांगतले होते असा आरोप कांदे यांनी केला आहे. एका निष्ठावान शिवसैनिकाला सुरक्षा नाकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांवर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगण्यात धन्यता वाटत होती असाही आरोप कांदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून धोका असल्याने राज्यातील गुप्तचर यंत्रणांकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान अशा प्रकराची कुठलीही घटना घडलेली नसल्याची प्रतिक्रिया तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0