स्वातंत्र्य सैनिकांच्या पैशांचा अपहार! सोनिया गांधींची ईडी चौकशी

21 Jul 2022 12:58:12
news


नवी दिल्ली
: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरू राहणार आहे. त्यासाठी प्रियांका गांधींसह सोनिया चौकशीला जाणार आहेत. त्यामुळे याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. संबंधित ईडी चौकशी कशाप्रकारे षडयंत्र आहे असा बेबनाव रचला जात आहे.
 
 
प्रकृती अस्थिर होऊ शकते! सोनियांकडून सबब
 
चौकशीदरम्यान जर सोनिया गांधी यांनी जर तब्येतीचे कारण दिले तर त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिी जाईल. त्यांच्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी दुसऱ्या खोलीत चौकशीवेळी उपस्थित असेल. सोनिया गांधींनी त्यांच्या कन्या प्रियांका गांधी यांना चौकशी दरम्यान उपस्थित रहाता यावे, अशी विनंती केली आहे. सोनियांच्या वकीलांना चौकशीवेळी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. प्रियंका गांधी सकाळी १० जनपथ या ठिकाणी पोहोचल्या होत्या.
 
देशभर काँग्रेसची निदर्शने सुरू!

काँग्रेस नेते शशि थरूर यांनीही हा प्रकार म्हणजे देशातील सर्वात जुन्या पक्षावरील अन्याय असल्याचे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही या चौकशीचा विरोध केला आहे. ईडीने सोनिया गांधींच्या घरी जाऊन जबाब नोंदवायला हवा, अशी प्रतिक्रीया दिली आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही या प्रकाराला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. "भाजप जर मोदींसाठी सर्वकाही करू शकते तर आम्ही सोनियांसाठी का करू नये," असा सवाल त्यांनीही विचारला आहे. 









Powered By Sangraha 9.0