हुबळी: कर्नाटकातील उडुपी येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका रुग्णवाहिकेचे नियंत्रण सुटले आणि टोल प्लाझाला धडकली. हा अपघात दि. २० जुलै रोजी कुंदापुराजवळील शिरूर टोलगेट येथे सायंकाळी चार वाजता झाला. प्राथमिक अहवालानुसार, या अपघातात रुग्णवाहिकेतील तीन आणि टोल प्लाझावरील एका कर्मचाऱ्यासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोल प्लाझा कर्मचारी रस्त्यावरील अडथळे दूर करून रुग्णवाहिकेसाठी जागा बनवताना दिसत आहेत. पुढे, वेगाने येणारी रुग्णवाहिकानिसरड्या रस्त्यावरून घसरली आणि वाहनाच्या मागच्या भागाला जोराने धडकून खांबाला धडकली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, टोल बूथवर धडकल्यावर काही व्यक्ती रुग्णवाहिका बाहेर फेकले जाताना दिसत आहेत. या रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला होन्नावरा येथे नेले जात होते.
मिळालेल्या वृत्तानुसार, ही घटना उडुपी जिल्ह्यातील बाइंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. बयंदूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितले की, होन्नावरहून उडुपी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या रुग्णवाहिकेत सात जण होते. टोल गेटचे कर्मचारी मार्गात अडथळा ठरणारे प्लास्टिकचे अडथळे हटवत असतानाच वेगवान वाहन टोल बुथवर धडकले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. फुटेजनुसार, निसरड्या रस्त्या मुळे रुग्णवाहिकेचे नियंत्रण सुटले.