गुत्थी आणि कपिल शर्मा पुन्हा येणार एकत्र?

21 Jul 2022 13:57:09

 
gurhi
 
 
 
मुंबई : डॉ.मशहूर गुलाटी आणि गुत्थीसारख्या भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवून हसवून वेड लावणाऱ्या सुनिल ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर प्रेक्षक सुनिल ग्रोव्हरच्या विनोदांना खूपच मिस करत होते. परंतु आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर येणार अशी चर्चा सुरु आहे.
 
 
सुनिल ग्रोव्हर आपल्या विनोदांमुळे, अभिनयामुळे एवढा प्रसिद्ध झाला आहे की त्याची स्वतंत्र ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. कॉमेडी नाइट्स विथ कपिल पासून सुनिल ग्रोव्हरने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर केले होते. परंतु सुनिल आणि कपिलमध्ये झालेल्या वादानंतर सुनिलेन त्याच्या शो ला रामराम केला. त्यामुळे सहाजिकच त्याचे चाहते नाराज झाले होते.
 
 
 
gurhi 
 
 
 
 
 
परंतु आता एवढ्या वर्षानंतर 'झालं गेलंगंगेला मिळालं, आता जे होऊन गेलं ते विसरुन जाऊया', असे म्हणत पुन्हा एकदा सुनिल ग्रोव्हर कपिल शर्मा बरोबर आपल्या विनोदांनी लोकांना हसवायला येत आहे. 'द कपिल शर्मा शो' नंतर सुनिल ग्रोव्हर 'इंडियाज लाफ्टर चॅंपियन' या शो मधून पून्हा कमबॅक करत आहे. शो चा प्रोमो रिलीज झाला आहे आणि सुनिल 'डॉ. मशहूर गुलाटी' च्या भूमिकेत सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
 
 
 
 
एवढ्या काळानंतर डॉ.मशहूर गुलाटीच्या रुपात सुनिल ग्रोव्हरला पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सगळेच सुनिलच्या विनोदाचे टायमिंग एन्जॉय करण्यासाठी वाट पाहत आहेत. प्रोमोमध्ये कार्यक्रमात हजर राहिलेल्या प्रेक्षकांसोबतच परिक्षक अर्चना पुराण सिंग आणि शेखर सुमन देखील सुनिलच्या विनोदावर खळखळून हसताना दिसत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0