मेट्रो-३ कारशेड आरेतच होणार! फडणवीस-शिंदे सरकारचा निर्णय

21 Jul 2022 14:21:07
मेट्रो
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्र सरकारने मेट्रो ३ साठी मुंबईतील आरे मिल्क कॉलनीत कारशेड बांधण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. आरे मिल्क कॉलनीत कारशेड बांधण्यावरील स्थगिती उठवण्यात आली आहे, असे अतिरिक्त मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रमुख भूषण गगराणी यांनी गुरुवारी दि. २१ जुलै रोजी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला आरे येथे कारशेड बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले होते.
 
 
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमएमआरसीला देखील कंत्राटदारांना एकत्रित करण्यास सांगितले आहे. यामुळे  साइटवर काम पुन्हा सुरू होणार आहे. बुधवारी दि. २० जुलै रोजी नगरविकास विभाग आणि एमएमआरसीमध्ये या विषयावर  चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एमएमआरसीला देखील कंत्राटदारांना एकत्रित करण्यास सांगितले आहे. यामुळे साइटवर काम लवकरच सुरू होईल.
 
 
मेट्रो-३ हा  नेव्ही नगर कुलाबा आणि सीप्झ(अंधेरी) यांना जोडणारा महत्वाकांशी प्रकल्प आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारने आरे कॉलनीमधल्या कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली होती. आणि हे कारशेड कांजुरमार्गला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ती आता उठवण्यात आली आहे. मुंबईकरांचा व्यापक हितासाठी हा निर्णय मोठा आहे. यामुळे कारशेडच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
 
 
“आम्ही संपूर्ण प्रकरण तपासले आहे आणि हे प्रकरण मंत्रिमंडळासमोर आणण्याची गरज नाही. आम्ही अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्रस्ताव तयार करण्यास आणि कंत्राटदाराची जमवाजमव करण्यास सांगितले आहे.” नगरविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
 


Powered By Sangraha 9.0