रामदास कदम ढोंगी, तर शिंदेगट नामर्द! उद्धव ठाकरेंची टीका

20 Jul 2022 14:51:13
uddhav thackeray





मुंबई :
पत्रकार परिषदेत ढसाढसा रडणाऱ्या माजी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी कदमांनी केलेल्या सर्वच आरोपांना प्रत्युत्तर देत घणाघात केल्याचे समजते आहे. रामदास कदमांनी शिवसेनेच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोपही ठाकरेंनी केला आहे. "त्यामुळे आता तुम्ही रडण्याची ढोंगंसोंगं करू नका,", असेही ठाकरे म्हणाले. "शिवसैनिक तुम्हाला पुरता ओळखून आहे," असा पलटवारही त्यांनी केला आहे.
"आता त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा आहे. तसंचं ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवशावर आहे. शिवसैनिक सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजप असो किंवा गद्दार नामर्द असो मला त्यांची पर्वा नाही. ते काहीकाळ सत्ता , उपभोगतील. पण जेव्हा भाजपाला कळेल हे काडीच्या कामाचे नाहीत, तेव्हा भाजप त्यांना फेकून देईल," असेही ठाकरे म्हणाले.

रामदास कदमांवर हल्लाबोल करताना ठाकरे प्रचंड आक्रमक झाले होते. "मागितलं तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तर मी त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. गद्दारांनी निवडणूकीला सामोरं जावं, मतं मिळवावीत. पण त्यांच्यात हिंमत नाही. कारण हे खरे मर्द नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणे, दुसऱ्यांची चिन्हे चोरण्याचा प्रयत्न करणं, मात्र ते चोरले जाऊच शकत नाही., असाही उल्लेख ठाकरेंनी केला.







Powered By Sangraha 9.0