मुंबई : भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका रिसॉर्ट मधील व्हिडिओ पोस्ट करत काय नाना तुम्ही पण असा प्रश्न विचारात नाना पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकारांवर घेललेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावण्याचा हेतू नाही पण जेव्हा एखादी खासगी गोष्ट सार्वजनिक होते तेव्हा ती खासगी राहत नाही त्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारण्याचा सर्वांनाच हक्क आहे अशी प्रतिक्रिया चित्र वाघ यांनी दिली आहे.
राज्यात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आपण सातत्याने आवाज उठवत राहूच आपण आपले ते काम बंद केलेले नाही असे ठासून सांगत चित्राताईंनी आपण यापुढेही या गोष्टींच्या विरोधात लढताच राहणार हे स्पष्ट केले. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे माझ्याविरुद्धचे राजकीय षडयंत्र आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.