डॉ. कला आचार्या यांना शीला दीक्षित 'संस्कृत श्री' पुरस्कार जाहीर!

20 Jul 2022 14:40:31


Dr. Kala Acharya.
 
 
 
नवी दिल्ली : संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्या यांचे संस्कृत विषय क्षेत्रातील विशेष योगदान पाहता, त्यांना शीला दीक्षित 'संस्कृत श्री' या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १९ जुलै) अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलनाद्वारे घेण्यात आला. शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीतील संस्कृत भवन सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
 
 
२०१९ पासून 'संस्कृत श्री' पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून संस्कृत भाषा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका महिलेस तो दिला जातो. शीला दीक्षित यांच्या स्मरणार्थ एका श्रध्दांजलीपर कार्यक्रमात त्यांचे सहकारी रमाकांत गोस्वामी यांनी या पुरस्काराविषयी घोषणा केली होती.
 
 
शीला दीक्षित या अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच संस्कृत भवन उभारले असून त्यांच्या कार्यकाळात साहित्य क्षेत्रातील लोकांना विशेष सन्मान व सुविधा दिल्या गेल्या. यामुळे त्यांच्या कार्यकाळात संस्कृतसह हिंदी, उर्दू आणि इतर भाषा समृद्ध झाल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0