शरीरप्रकृती आणि रोगप्रवणस्थिती ही प्रत्येक माणसाच्या आरोग्यातील जे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्या अभ्यासानुसारच आपल्याला प्रत्येक माणसाचे वेगळेपण (इंडिव्हिज्युलायझेशन) कळते.
रोगानुकूल घटक म्हणजे ‘डायाथिसीस.’ हा घटक माणसाच्या शरीरात ठरावीक आजाराला अनुकूल अशी परिस्थिती तयार करतो. म्हणजेच रोगप्रवणस्थिती तयार करण्यात या ‘डायाथिसीस’चा महत्त्वाचा सहभाग असतो. ‘डायाथिसीस इज नॉट डीसिज बट अ प्रीडिस्पोझिशन.’ म्हणजे ‘डायाथिसीस’ हा काही आजार नाही, तर वातावरणातील, तसेच आहारातील काही घटकांमुळे तो रोगप्रवणस्थिती तयार करणारा घटक आहे, जो पुढे जाऊन आजारात रुपांतरित होऊ शकतो. यामध्ये शरीरातील पेशी या बाहेरील उद्दीपनाला ठरावीक पद्धतीनेच प्रतिक्रिया देतात व या ठरावीक प्रतिक्रियेमुळेच हे लोक काही ठरावीक आजारांसाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करत असतात.
या ‘डायाथिसीस’च्या तयार होण्यामागे जनुकीय यंत्रणेचाही मोठा सहभाग असतो. आनुवंशिकतेने काही सवयी, गुण व ठेवणही तयार होत असते व त्या-त्या सवयी गुण व ठेवण यामुळेच मग रोग होण्याची शक्यताही जास्त असते. अशा जनुकीय रोगप्रवण स्थितीला जर नियंत्रणात ठेवायचे असेल, तर त्याला होमियोपॅथीशिवाय पर्याय नाही. कारण, होमियोपॅथीची औषधे ही निरोगी माणसांवर ‘डायनॅमिकली’ सिद्ध केलेली असतात व त्यामुळे माणसाच्या जनुकीय ठेवणीवरही सकारात्मक परिणाम करण्याची ताकद ही औषधे ठेवतात. म्हणूनच कित्येक आजार जिथे इतर औषधशास्त्रे इलाज करू शकत नाहीत, त्या ठिकाणी होमियोपॅथीने रुग्णांना आराम मिळतो व आजार बरे होतात. डॉ. सी. जे. बर्नेट यांनी सर्वप्रथम होमियोपॅथीमध्ये ही स्थिती समजावून सांगितली.
It's a borderline state between normal susceptibility and expression of the disease. डॉ. बर्नेट यांनी क्षयरोग प्रवृत्त घटक व ग्रंथीवृद्धी प्रवृत्त घटक असे दोन प्रकार अभ्यासले. त्यानंतर खालील प्रकारचे रोगप्रवृत्त घटक शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले. काही महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे- Lymphatic Diathesis, Dyscratic Diathesis, Rheumatic Diathesis or Gouty Diathesis, (संधीवात प्रवृत्त स्थिती), Tubercular Diathesis (क्षयरोग प्रवृत्त करणारे घटक), (रक्तस्राव प्रवृत्त करणारे घटक), Hemorrhagic Diathesis (रक्सस्त्राव प्रवृत्त करणारे घटक), Scrofulous Diathesis.
वरील सर्व घटक हे प्रत्येक माणसामध्ये त्या-त्या माणसाच्या शारीरिक व मानसिक आनुवांशिक ठेवणीवर अवलंबून असतात. एकाच वातावरणात राहणार्या दोन माणसांना म्हणूनच सारखाच आजार होतोच, असे नाही. म्हणजेच काय, तर हे सर्व घटक हे शेवटी माणसाच्या वैयक्तिक जडणघडणीवर अवलंबून असतात. या पुढे आपण या काही घटकांबद्दल अजून माहिती करून घेऊया.
- डॉ. मंदार पाटकर