मुंबई : गणेशोत्सव आला की कोकणात जाण्यासाठी चाकरमानांची गावाची वाट धरतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेवर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. कोकणात जाण्यासाठी जवळपास २०६ जाद्या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्याचे आरक्षण विशेष शुल्कासह रेल्वेच्या www.irctc.co.in संकेतस्थळावर जाऊन करता येतील.
गणेश उत्सवाकरीता कोकणात जाण्याऱ्या विशेष गाड्या पुढीलप्रमाणे -
मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (४४ सेवा)
०११३७ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. २१ ऑगस्ट २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज रात्री ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११३८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २१ ऑगस्ट २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी रात्री ०३.४५ वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.
नागपुर - मडगाव द्वि साप्ताहिक विशेष (१२ सेवा)
०११३९ विशेष नागपूर येथून दि. २४ ऑगस्ट २०२२ ते दि. १० सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
०११४० विशेष मडगाव येथून दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
पुणे - कुडाळ विशेष (६ सेवा)
०११४१ विशेष पुणे येथून २३ ऑगस्ट २०२२, दि. ३० ऑगस्ट २०२२ आणि दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११४२ विशेष कुडाळ येथून दि. २३ ऑगस्ट २०२२, दि. ३० ऑगस्ट २०२२ आणि ६ सप्टेंबर २०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.
या स्थानकावर थांबेल : लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
गाडीची स्थिती : १५ तृतीय वातानुकूलित, ३ शयनयान
पुणे - थिविम/कुडाळ पुणे विशेष (६ सेवा)
०११४५ विशेष पुणे येथून दि. २६ ऑगस्ट २०२२, दि. २ सप्टेंबर २०२२ आणि दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
०११४६ विशेष कुडाळ येथून दि. २८ ऑगस्ट २०२१, दि. ४ सप्टेंबर २०२२ आणि दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
या स्थानकावर थांबेल : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड (फक्त ०११४५ साठी), थिविम (फक्त ०११४५ साठी)
गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
पनवेल - कुडाळ - थिविम - पनवेल विशेष (६ सेवा)
०११४३ विशेष ट्रेन पनवेल येथून दि. २८ ऑगस्ट २०२२, दि. ४ सप्टेंबर २०२२ आणि दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११४४ विशेष ट्रेन थिविम येथून दि. २७ ऑगस्ट २०२२, दि. ३ सप्टेंबर २०२२ आणि दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर थांबेल : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ (फक्त ०११४४ साठी), सावंतवाडी रोड (फक्त ०११४४ साठी)
गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (१६ सेवा)
०११३७ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दि. २० ऑगस्ट २०२२ (८ सेवा) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
०११३८ विशेष सावंतवाडी रोड येथून दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दि. २० ऑगस्ट २०२२ (८ सेवा) दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
नागपुर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा)
०११३९ विशेष नागपूर येथून दि. १३ ऑगस्ट २०२२, दि. १७ ऑगस्ट २०२२ आणि दि. २० ऑगस्ट २०२२ (३ सेवा) रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
०११४० विशेष मडगाव येथून दि. १४ ऑगस्ट २०२२, दि. १८ ऑगस्ट २०२२ आणि दि. २१ ऑगस्ट २०२२ (३ सेवा) रोजी रोजी १९.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
पुणे - कुडाळ विशेष (२ सेवा)
०११४१ विशेष गाडी दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथून ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११४२ विशेष दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी कुडाळ येथून १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.
पुणे - थिविम - कुडाळ - पुणे विशेष (४ सेवा)
०११४५ विशेष पुणे येथून दि. १२ ऑगस्ट २०२२ आणि दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
०११४६ विशेष कुडाळ येथून दि. १४ ऑगस्ट २०२२ आणि दि, २१ ऑगस्ट २०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
पनवेल - कुडाळ - थिविम - पनवेल विशेष (४ सेवा)
०११४३ विशेष पनवेल येथून दि. १४ ऑगस्ट २०२२ आणि दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
०११४४ विशेष थिविम येथून दि. १३ ऑगस्ट २०२२ आणि दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विशेष गाड्या
०११५३ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२२ (३० सेवा) पर्यंत दररोज २२.१५ वाजता सुटेल आणि ठोकूर येथे दुसऱ्या दिवशी १६.३० वाजता पोहोचेल.
०११५४ ही विशेष गाडी दि. १४ ऑगस्ट २०२२ ते दि. १२ सप्टेंबर २०२२ (३० सेवा) दरम्यान ठोकूर येथून दररोज १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
०११६५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १६ ऑगस्ट ते दि. ६ सप्टेंबर (४ सेवा) पर्यंत दर मंगळवारी ००.४५ वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल तर ०११६६ विशेष दि. १६ ऑगस्ट ते दि. ६ सप्टेंबर (४ सेवा) पर्यंत दर मंगळवारी मंगळुरु जंक्शन येथून २२.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता पोहोचेल.
मुंबई सेंट्रल - ठोकूर - मुंबई सेंट्रल (राप्ताहिक) विशेष गाड्या
मुंबई सेंट्रल येथून मंगळवारी दि. २३ ऑगस्ट, दि. ३० ऑगस्ट आणि दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ठोकूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ठोकूरहून मुंबई सेंट्रलकरिता बुधवार, दि. २४ ऑगस्ट आणि दि. ३१ ऑगस्ट तसेच दि. ७ सप्टेबर रोजी रात्री १०.४५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ७ वाजता पोहोचेल.
मुंबई सेंट्रल - मडगाव जं. - मुंबई सेंट्रल (मंगळवारव्यतिरिक्त दररोज) विशेष गाड्या
मुंबई सेंट्रल येथून दि. २४ ऑगस्ट ते दि. ११ सप्टेंबर या काळात सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १२ वाजता ही गाडी सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत बुधवारव्यतिरिक्त दररोज सकाळी ९.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटेपूर्वी १ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.
वांद्रे - कुडाळ - वांद्रे साप्ताहिक विशेष गाडी
गुरुवारी, दि. २५ ऑगस्ट आणि दि. १ सप्टेंबर तसेच दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी शुक्रवारी, दि. २६ ऑगस्ट, दि. २ सप्टेंबर आणि दि. ९ सप्टेंबरला सकाळी ६:४५ वाजता सुटेल आणि रात्री ९:३० वाजता वांद्रे येथे पोहोचेल.
गणेशोत्सवासाठी विशेष मेमू सेवा
०११५७, मेमू
दि. १९ ऑगस्ट २०२२ ते दि. २१ ऑगस्ट २०२२ पर्यंत, दि. २७ ऑगस्ट २०२२ ते दि. ०५ सप्टेंबर २०२२ आणि दि. १० सप्टेंबर २०२२ ते दि. १२ सप्टेंबर २०२२ (१६ सेवा) रोहा येथून दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.
०११५८, मेमू
चिपळूण येथून दि. १९ ऑगस्ट २०२२ ते २१ ऑगस्ट २०२२, दि. २७ ऑगस्ट २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ आणि १० सप्टेंबर २०२२ ते १२ सप्टेंबर २०२२ (१६ सेवा) पर्यंत दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
असे असतील थांबे : माणगांव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या आधिक तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.