‘एमपीएससी’ परीक्षा आणि भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करा

18 Jul 2022 14:40:52

devendra fadanvis
 
 
मुंबई: दोन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा आणि भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात याव्यात आणि मुलांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासर्व प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, यासाठी उपमुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली.
 
 
 
कोरोना काळामुळे गेली दोन वर्षे या नियुक्त्या रखडलेल्याच आहेत. परीक्षांच्या तारखा सातत्याने पुढे ढकलल्या जाणे, निकाल वेळेवर न लागणे, यासारख्या समस्यांचा सामना हे विद्यार्थी गेली दोन वर्षे करत आहेत. या सर्व मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलनेही करण्यात आली होती. तरीही महाविकास आघाडी सरकारकडून त्याची दाखल घेतली गेली नाही. पण आता फडणवीस-शिंदे सरकारकडून तरी या प्रश्नांची दाखल घेतली जावी आणि हे प्रश्न सोडवले जावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0