काँग्रेसकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा, आता विरोधी पक्षनेतेपदावरून धुसफूस ?

17 Jul 2022 18:27:40
 
nana
 
 
 
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळायला हवे या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आग्रह धरला असल्याने महाविकास आघाडीत नवीनच पेच निर्माण झाला आहे. विधानसभेत विरोधीपक्षनेते म्हणून राहस्त्रवाडी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याने आता दुसऱ्या विरोधीपक्षनेत्यासाठी जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे.
 
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबद्दल ट्विट करत काँग्रेसचा दावा मजबूत केला आहे. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस चाव्हत्यावर येण्यास सुरुवात झाली होती. आधी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर हा शिवसेनेचा वैयक्तिक निर्णय असून महाविकास आघाडीचा काहीच संबंध नाही असे काँग्रेसने जाहीर करत उघड नाराजी व्यक्त केली होती. आत विरोधी पक्षनेतेपदावरूनही महाविकास आघाडीमध्ये जुंपणार असल्याची चिन्हे आहेत.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0