वाढदिवसादिवशी कॅट देणार गुड न्यूज?

16 Jul 2022 12:50:16
 
 
 
kat
 
 
 
 
मुंबई : बॉलिवूडची कूल कॅट म्हणून ओळख असणारी कतरिना कैफ आज ३९ वर्षांची होत आहे. कतरिना कैफ आज चाळीशीत पदार्पण करत असली तरी तिचे सौंदर्य आणि फिटनेस बाकीच्या अभिनेत्रींना लाजवणारे आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. मागच्या वर्षीच विकी कौशलशी कॅट विवाहबद्ध झाली आहे. आणि आता आलिया नंतर कॅटसुद्धा गोड बातमी देणार अशी चर्चा सुरु आहे.
 
 
 
 
 
बॉलीवूडच्या क्युट कपलने म्हणजेच आलिया-रणबीरने लग्नानंतर दोन महिन्यातच गोड बातमी दिली होती, त्यामुळे नेटकरी दीपिका आणि कतरिना यांना गोड बातमी कधी देणार, असा सवाल करू लागले होते. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या पार्टीपासून कतरिना ही गायब असल्याचे सांगितले जात होते, तसेच ती सोशल मिडीयावर देखील ऍक्टिव्ह नव्हती, त्यामुळे आता कॅटसुद्धा कदाचित वाढदिवसाच्या दिवशी मोठी गोड बातमी शेअर करेल असा तर्क तिच्या चाहत्यांकडून लावला जात आहे.
 
 
 
 
 
 
लग्नानंतर हा तिचा पहिला वाढदिवस असल्यामुळे तो तिच्यासाठी खास असणार आहे. आणि वाढदिवसानिमित्ताने मिस्टर आणि मिसेस कौशल मालदीवला रवाना झाल्याचे दिसून येत आहे. कतरिनाचा हा वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी, कतरिना यांच्याबरोबर विकीचा भाऊ सनी, त्याची गर्लफ्रेंड शर्वरी, तसेच दिग्दर्शक कबीर खान, मिनी माथूर सुद्धा सेलिब्रेशनसाठी उपस्थित असणार आहेत. आजच हे विकी आणि कतरिनाला विमानतळावर पाहायला मिळालं. त्यावेळी कतरिनाने लूज कपडे घातल्याचे दिसून आले. त्यामुळे कदाचित कपड्यांमधून कॅट आपला बेबी बम्प लपवत असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0