केतकी माटेगावकरच्या भावाने का केली आत्महत्या?

16 Jul 2022 12:47:48

ketaki
 
 
 
 
 
पुणे : सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाने पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोकरी मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अक्षय असे त्याचे नाव असून, तो अवघ्या २१ वर्षांचा होता. अक्षय माटेगावकर हा केतकीचा चुलत भाऊ होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचे एक सूसाईड नोट लिहून ठेवली होती.
 
 
 
 
 
 
अक्षय हा इंजिनीअरिंग करत होता. आणि शिक्षणानंतर 'प्लेसमेंट' मिळणार नाही या भीतीने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना सुसगाव येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. अक्षय हा कम्प्युटर इजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. परंतु नोकरी मिळणार नाही या भीतीने घाबारून जाऊन त्याने आपल्या राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली.
 
 
 
 
 
 
ketaki
 
 
 
 
 
अक्षयने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ‘ही शेवटची गोष्ट असेल जी मी लिहीत आहे. आई, बाबा, आकांक्षा मला माफ करा. तुमच्या अपेक्षा पूर्ण न करण्यासाठी मी माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले पण मला जमलं नाही. माझ्या इन्टर्नशिपमध्ये मी चांगले काम केले नाही आणि त्यामुळे मला माहित आहे की मला चांगली नोकरी मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला सांगायची माझ्यात हिंमत नाही. आणि याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नाही. आई बाबा आकांक्षा मला माफ करा. तुमचा अक्षय माटेगावकर.”
 
 
 
 
 
असे म्हणत अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या धक्कादायक कृतीने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. अक्षयच्या घरची परिस्थिती उत्तम होती तसेच त्याचे पालक नोकरी करतात अशी माहिती समोर येत आहे. अक्षय मित्रांसोबत माउंट युनियन सोसायटीच्या आठव्या मजल्यावर राहायचा. तिथूनच उडी मारून त्याने प्राण दिल्याचं समोर येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0