'नरेंद्र मोदींसारखा महान श्रोता शोधून सापडणार नाही!' - विवेक अग्निहोत्री

15 Jul 2022 18:58:11
 

modi 
 
 
 
 
नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मिडीयावर सक्रिय असणारे दिग्दर्शक आहेत. चांगल्या गोष्टींची भरभरून प्रशंसा व खटकणाऱ्या गोष्टींवर परखड टीका ते करत असतात. नुकतीच विवेक अग्निहोत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. ट्विटवर ट्वीट करत विवेक अग्निहोत्री म्हणतात त्यांना आपल्या जीवनात नरेंद्र मोदींसारखा श्रोता मिळालाच नाही.
 
 
 
 
 
विवेक अग्निहोत्री ट्विटरवर लिहितात, 'मला आत्तापर्यंतच्या प्रवासात नरेंद्र मोदींसारखा महान श्रोता शोधून सापडला नाही आहे. त्यांच्यासारखा महान श्रोता आजपर्यंत मी पाहिला नाही.' पुढे अग्निहोत्री म्हणतात, 'जेव्हा तुम्ही कोणाचे म्हणणे ऐकता आणि केवळ आपली मान हलवत असता, त्यावेळी ते बोलणाऱ्यात ऑक्सीटोसिन सोडते. ऑक्सीटोसिन एक तालमेल आणि विश्वास निर्माण करणारा न्युरोकेमिकल आहे. आपल्या चहूबाजूंनी पाहा, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, ते सर्व चांगले श्रोते असायला हवे. ऐकणे कला नाही, विज्ञान आहे. #रचनात्मक चेतना.'
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
यावर नेटकऱ्यांनी त्यांची फिरकी घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी प्रश्न विचारत आहेत, 'आता कोणत्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहात?' यावर अग्निहोत्री म्हणतात, 'सायलेंट फील्म', दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, 'विवेक अग्निहोत्रीन यांनी आतापर्यंत जे काही म्हटले आहे, ते सर्वसामान्य माणसाला ऐकणे समजणे, अवघडच आहे. मी त्यासाठी मोदीजींचे कौतुक करतो.' तर आणखी एकाने लिहिले आहे, 'सर्वात चांगले श्रोते तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेच होते, जे नेहमी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचेच ऐकत होते.'
Powered By Sangraha 9.0