गुड्डू भैय्या आणि कालिन भैय्या मधला तणाव वाढणार !

15 Jul 2022 15:31:47

guddu
 
 
 
 
 
मुंबई : सध्याचा जमाना हा ट्रेंडचा जमाना आहे. एखादा ट्रेंड आला की सगळे तोच फॉलो करू लागतात. शिवाय मालिका, चित्रपट या सर्व माध्यमात सिक़्वेलची फॅशन आली आहे. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्हणजे 'मिर्झापूर'. ही वेबसिरीज किती गाजली होती हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आता त्याच्या तिसऱ्या भागात काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
 
 
 
 
 
प्रेक्षकांची पसंत आणि मागणी बघून निर्माते लवकरच आता मिर्झापूर सीजन ३ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. तत्पूर्वी सिझन ३च्या कथेचा अंदाज लावला जात आहे. असे म्हटले जात आहे की, कालिन भैय्याचा मुलगा मुन्नाच्या हत्येमुळे खूप संतप्त दिसणार आहे. तर दुसरीकडे, गुड्डू भैया पूर्वीपेक्षा म्हणजेच गेल्या दोन्ही सिझनपेक्षा अधिक भयानक रुपात दिसणार आहे.त्यामुळे हा सीजन पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
 
 
 
त्यामुळे 'मिर्झापूर ३' मध्ये प्रेक्षकांना कालिन भैय्या आणि गुड्डू भैय्या यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. गुड्डू भैय्यालाही यावेळी तुरुंगात जावं लागणार आहे. निर्मात्यांनी सिझन ३ ला पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि मनोरंजक बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईत सुरु असलेल्या सततच्या संततधार पावसातच 'मिर्झापूर 3' चं शूटिंग सुरु आहे. त्यामुळे हा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार यात काही शंकाच नाही.
 
 
 
 
 
त्याचबरोबर या वेबसीरिजमुळे अभिनेता अली फजलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. सिझन ३ मध्ये अली पूर्वीपेक्षा अधिक भयानक रुपात दिसणार आहे. त्यामुळे या भूमिकेत स्वतःला आणखी परफेक्ट बसवण्यासाठी अलीने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्या हे ट्रान्सफॉर्मेशनने थक्क होणार आहेत. अली फजल सध्या मुंबईत सिझन ३ चे शूटिंग करत आहे. 'मिर्झापूर 3'मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. पंकज त्रिपाठी लवकरच मुंबईत होत असलेल्या सीजन ३ च्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सर्व माहितीनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढणार हे नक्की.
 
Powered By Sangraha 9.0