फळ्यावर ‘जय श्री राम’ लिहल्याबद्दल चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

14 Jul 2022 15:42:44
झार
 
 
रांची: झारखंडमधील गिरिडीह येथील सरकारी शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला दि. ९ जुलै रोजी वर्गाच्या फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याबद्दल क्रूरपणे मारहाण करण्यात आली. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पाल्मो गावात ही घटना घडली आहे.
 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपग्रेडेड गव्हर्नमेंट मिडल स्कूल पाल्मो (यूजीएमएसपी) चे मुख्याध्यापक मोहम्मद अबुल कलाम यांनी दि. ९ जुलै रोजी चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या मुलाने ब्लॅकबोर्डवर 'जय श्री राम' लिहिले होते. पीडित मुलाने आपला त्रास पालकांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला, पुढील हल्ल्याच्या भीतीने मुलाने आपल्या कुटुंबाला काय घडले हे सांगणे टाळले. परंतु पालकांनी वारंवार विचारणा केली असता, ही बाब समोर आली.
 
स्थानिक ग्रामस्थांनी दि.१३ जुलै रोजी शाळेत एक बैठक बोलावली. पंचायतीचे असंख्य उल्लेखनीय सदस्य, मुख्याध्यापक अबुल कलाम आणि शाळा प्रशासन समितीसह डझनभर लोक या बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान इतर अनेक पालकांनी मुख्याध्यापक मोहम्मद अबुल कलाम यांच्यावर मुलांना शाळेतील स्वच्छतागृहे साफ करण्यास भाग पाडल्याचा आरोपही केला. अनेक संतप्त गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला त्याच्या शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांवर अत्याचार केल्याबद्दल फटकारले. वातावरण तापलेले पाहून पंचायत सदस्यांनी झारखंडमधील हजारीबाग येथील स्थानिक मुफसिल पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिस आल्यावर त्यांनी गर्दी पांगवण्यापूर्वी प्रथम संतप्त झालेल्या स्थानिकांना शांत केले. या घटनेची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी पुष्पा कुजूर यांनाही देण्यात आली, त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळल्यास मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
Powered By Sangraha 9.0