जागतिक कीर्तीच्या संकटमोचकाचे अभीष्टचिंतन

14 Jul 2022 11:43:58
Vishal Kadne

 
 
 
पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत जाणारी माती आणि मातीचे होणारे द्रवीकरण कसे रोखता येईल, मातीच्या द्रवीकरणामुळे वृक्षलागवडीवर होणारे दुष्परिणाम, द्रवीकरण थांबवून मातीची होणारी हानी कशी थांबवता येईल इत्यादी संबंधी महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून त्याबाबतच्या संरक्षक उपाययोजना आपल्या प्रबंधामध्ये मांडत वृक्षसंवर्धनाकरिता मुंबईतील एक तरुण अभियंता विशाल कडणे गेली सात वर्षे सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयत्न करत आहे.
 
 
 
Vishal Kadne
 
‘माय होम इंडिया’च्या कार्यात सक्रिय सहभाग
 
 
 
 
 
 
 

Vishal Kadne 
 
मूळचे सिंधुदुर्गचे असलेले विशाल कडणे हे आपल्या माती द्रवीकरणावरील प्रबंधामुळे अनेक वृक्षप्रेमींच्या संपर्कात असून वृक्षलागवड आणि जोपासनेसाठी ते प्रयत्नशील आहेत. 2010 पासून कोकणामध्ये अनेक बागायतदारांना वृक्षलागवडीचे धडे देताना पारंपरिक पद्धतींपासून ते नावीन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय ‘थिअरीज’ समजावत असताना त्यांना आलेले अनेक अनुभव नवनवीन प्रयोगांसाठी ते अवलंबत असतात. ‘बोन्साय’ वृक्षांची लागवड गृहशोभेसाठी करत असताना त्यांची निगा कशी राखावी, बिया रुजण्यापासून ते ‘बोन्साय’ हा शोभेच्या वृक्षसंवर्धनापर्यंतचा अनुभव विशाल कडणे यांनी यावेळी कथन केला. ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ करून भूमिगत पाण्याचे साठे कसे वाढवता येईल, या विषयावर त्यांनी 2003 साली लिहिलेला प्रबंध आजही अनेकांना फायदेशीर ठरत आहे.
 
 
 
 
 
Vishal Kadne
 
 
 
 
 
मुंबईतील वाढत्या पर्जन्यमानामुळे मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या वृक्षलागवडीच्या ठिकाणी मातीचे द्रवीकरण झाल्यास निसर्गाची खूप मोठी हानी होईल. त्यामुळे सदरील द्रवीकरण रोखण्याकरिता कोणकोणत्या संरक्षक उपाययोजना मांडता येतील व त्याबाबतच्या विविध ‘केस स्टडीज’ इत्यादी बाबतीतला महत्त्वपूर्ण असा प्रबंध वृक्षसंवर्धनाकरिता अतिशय उपयुक्त ठरत आहे. त्याबाबत अनेक वन्यप्रेमी वृक्षसंवर्धनाकरिता पुढे सरसावले आहेत. सदरचा प्रबंध वृक्षसंवर्धन आणि जोपासना याकरिता उपयुक्त ठरेल, असा आत्मविश्वास अनेक वनप्रेमींनी व्यक्त केला आहे. इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’कडून वृक्षसंवर्धनाच्या कार्याची नोंद.
 
 
 
 
 
 

Vishal Kadne 
दैवज्ञ समाजासाठी सातत्याने आठ वर्ष ‘दैवज्ञ चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. सात राज्यांतून 500 हून अधिक खेळाडूंचा दरवर्षी सक्रिय सहभाग
 
 
 
 
 
 
कोकणातील 1 हजार आपत्तीग्रस्तांना मदत 
 
Vishal Kadne1 
 
महाड, पोलादपूर येथील जलमय परिस्थितीच्या आढाव्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपत्ती निवारणासाठी मदतीचे आवाहन केले होते. दरेकर यांनी केलेल्या आवाहनाला समाजातील विविध स्तरांतील लोकांकडून मोठा प्रतिसादही मिळाला. अनेक समाजसेवी संस्था आणि विविध संघटनांच्यावतीने मदतीचा हात आपत्तीग्रस्तांना देण्यात आला. भांडुपच्या ’आयुष्यमान’ रुग्णालयाच्यावतीने कोकणातील एक हजार आपत्तीग्रस्तांना पुरेल, अशा स्वरूपात ताप, सर्दी, खोकला आदी आजारांवरील, तसेच ‘व्हिटॅमिन्स’सह इतर महत्त्वपूर्ण औषधेही देण्यात आली.
 
 
 Vishal Kadne
 ‘मिस एशिया’ श्रिया परब यांच्या हस्ते 51 दत्तक विद्यार्थी योजनेची सुरूवात
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0