मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट ह्या नव्या जोडप्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच दोघे आई-बाबासुद्धा होणार आहेत. शिवाय या दोघांचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहेत त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते एका मागून एक आनंदाच्या बातम्या देत आहेत. आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
आलिया आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे मोठ्त्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. असे असतानाच आता ब्रह्मास्त्रचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अरिजित सिंग चा आवाज आणि आलिया -रणबीरची जोडी यामुळे या गाण्याची उंची अधिकच वाढली.
रणबीर - आलियाच्या लग्नात 'केसरिया' गाण्याची फक्त झलकच प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जी याने रणबीर-आलियाला लग्नाच्या शुभेच्छा म्हणून केसरियाचा टीझर प्रदर्शित केला होता आणि तो प्रेक्षकांना एवढा आवडला की संपूर्ण गाणे केव्हा प्रदर्शित होईल याची सर्व वाट पाहू लागले. प्रेक्षकांसाठी प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे कारण केसरिया गाणे १५ जुलै सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.