वारकरी बांधवाना पंढरपुरात उपवासाच्या खाऊचे वाटप

10 Jul 2022 19:41:55

dabbewala
 
 
पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीचा उत्सव देशभरात आनंदात साजरा होत असताना पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्ताचा महापूर आला आहे. गेले २५ दिवसांपासून लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या संत ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली आणि अन्य पालख्या पंढरपुरात आज एकादशीच्या दिवशी दाखल झाल्या.

dabbewala 
 
मुंबईतून मुंबई डब्बेवाला संघटनेचे पांडुरंगाच्या भक्तांनी पंढरपुरात वारकरी बांधवाना उपवासाच्या खाऊचे वाटप केले. खाऊची व्यवस्था मुंबईतील ज्ञानदा प्रबोधन संस्था, शिव स्वराज्य संघटना, राष्ट्राभिमानी सेवा समितीच्या आणि मुंबई डब्बेवाला संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. त्यासाठी प्रशांत पळ, नितीन येंडे आणि जगदीश गोहिल यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री उल्हास मुके पदाधिकारी श्री किरण गावंडे, विनोद चोरगे आणि अन्य सभासदांच्या हस्ते पंढरपुरात हे वाटप करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0