श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी ५ आणि १५ जुलै रोजी सुनावणी

01 Jul 2022 19:28:04

श्रीकृष्ण जन्मभूमी
 
 
नवी दिल्ली : भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान आणि शाही मशिद इदगाह प्रकरणी दखल आठ याचिकांवर मथुरा दिवाणी न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) ५ आणि १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
 
 
भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील प्रकरणावर तोडगा निघाल्यानंतर आता भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरा येथील त्यांच्या जन्मभूमीच्या संदर्भात न्यायालयात दाखल खटल्यांची सुनावणी सुरू आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीला लागून असलेली शाही मशीद इदगाह हटवण्याची आणि संपूर्ण जमीन श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टला सोपविण्याचे आदेश देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
 
 
अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मस्थानाशी संबंधित खटले एकत्रितपणे सुनावणी घेऊन लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने मनीष यादव आणि महेंद्र प्रताप सिंग यांच्या प्रकरणी सुनावणीसाठी ५ जुलैची तारीख निश्चित केली आहे. शैलेंद्र सिंह, दिनेश शर्मा, अनिल त्रिपाठी, पंकज, पवन शास्त्री आणि रंजना अग्निहोत्री यांच्या खटल्याची सुनावणी १५ जुलैला निश्चित करण्यात आली आहे. याचिकांमध्ये संपूर्ण परिसराचे कोर्ट आयुक्ताद्वारे तसेच पुरातत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0