इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली मोदींची भेट

09 Jun 2022 11:45:50
 

 

 
 
 
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर असलेले इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीराब्दोल्लाहियान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन सभ्यता आणि सांस्कृतिक संबंधांच्या स्मृतींना उजाळा दिला. दोन्ही नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांवर चर्चा केली. करोनानंतरच्या काळात दोन्ही देशांनी देवाणघेवाण गतिमान करण्यासाठी काम केले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0