२५ वर्षे पक्षासाठी झटलो! कौतूक सोडा साधं फूलही दिलं नाही!

राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांची पक्षाविरोधात उघड नाराजी

    06-Jun-2022
Total Views |

sp

 
रत्नागिरी : २५ वर्षे पक्षासाठी अहोरात्र झटलो, पक्षाच्या वरिष्ठांनी साधे फुलही दिले नाही.आपण गेली ४० वर्षे राजकारण, समाजकारणात सक्रीय आहोत. लोकांच्या सुखदुःखात सहभागी असताना अनेकवेळा मोर्चे, आंदोलने केली. याचे श्रेय पक्षालाच मिळाले. काही वेळेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले, अधिकार्‍यांचा व जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागला. एवढे करून पक्षाच्या एकाही वरिष्ठ नेत्याने प्रदेश कार्यालयात बोलावून कधी कौतूक तर सोडाच पण साधे फुलही कधी दिले नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष, माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी व्यक्त करताना घरचा अहेर दिला.
 
 
 
वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत एकत्र येतात. मग आम्ही कशाला भांडत बसायचे. त्यांच्या खुर्चीसाठी ते गप्प बसतात, मग आम्ही मारामारी कशाला करायच्या. आम्हीही पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर पालिकेत आघाडी करण्याच्या मनस्थितीत आहोत, तशी आमची चर्चा सुरू आहे. आघाडी करून आम्ही विरोधकांना झोपवणार असे सांगून वरिष्ठांचे काय घेवून बसलात, आम्ही वरिष्ठ नाही का, आम्ही येथे काम करून पक्ष वाढवतो, त्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो पण २५ वर्षात पक्षाने कधीही आमचा सन्मान केला नाही की साधे फुलही दिले नाही. ते मला काय विचारणार, असा सवाल करीत आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यांची आम्हाला कामे करावी लागतात, असेही मुकादम यांनी स्पष्ट केले.