पर्यावरण संरक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत : पंतप्रधान मोदी

05 Jun 2022 16:25:31
 
pm
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारने पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेल्या अनेक उपाययोजनांचा उल्लेख केला. पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने 'माती वाचवा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताने अंतिम मुदतीच्या पाच महिन्यांपूर्वी पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. देशामध्ये पर्यावरण संरक्षण असूनही होणारे प्रयत्न हे बहुआयामी आहेत."
 
 
"२०१४ मधील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या १.५ टक्क्यांवरून आता १० टक्क्यांपर्यंत वाढल्याने कार्बन उत्सर्जन २७ लाख टनांनी कमी झाले आहे. ४१,००० कोटी रुपयांची परकीय चलन बचत झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना ४०,००० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भारताने निर्धारित मुदतीच्या नऊ वर्षांपूर्वी जीवाश्म इंधन आधारित स्त्रोतांकडून स्थापित केलेल्या ४० टक्के ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. गेल्या आठ वर्षांत भारताचे वनक्षेत्र २०,००० चौ.कि.मी.ने वाढले असून, वन्यजीवांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे." असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
'माती वाचवा' अंतर्गत  उपक्रम :
 
१. २०७० पर्यंत नेट-झिरोच्या भारताच्या उद्दिष्टाचा त्यांनी पुनरुच्चार केला. माती वाचवण्यासाठी भारताने मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. माती रसायनमुक्त करणे, जमिनीत राहणारे जीव वाचवणे, जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याची उपलब्धता वाढवणे, भूगर्भातील कमी पाण्यामुळे जमिनीचे होणारे नुकसान दूर करणे आणि जंगले कमी झाल्यामुळे जमिनीची सतत होणारी धूप थांबवणे.
 
२. शेतकर्‍यांना पूर्वी मातीचा प्रकार, मातीची कमतरता आणि त्यात किती पाणी आहे याची माहिती नव्हती, त्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने त्यांना माती आरोग्य कार्ड देण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे.
 
३. देशात १३ मोठ्या नद्यांचे संवर्धन करण्याची मोहीमही सुरू झाली असून, पाण्यातील प्रदूषण कमी करण्याबरोबरच नद्यांच्या काठावर जंगले लावण्याचे कामही सुरू आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे ७,४०० चौरस चौरस क्षेत्राचे वनक्षेत्र वाढणार आहे.
 
४. सरकारने गंगेच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ते नैसर्गिक शेतीचा एक मोठा कॉरिडॉर बनवेल. यामुळे आपली शेती केवळ रसायनमुक्त होणार नाही तर गंगा मोहिमेलाही नवीन बळ मिळेल. भारत २०३० पर्यंत २६ दशलक्ष हेक्टर नापीक जमीन सुपीक करण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
५. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय गतिशक्ती मास्टर प्लॅनमुळे लॉजिस्टिक यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि त्यामुळे प्रदूषण कमी होईल, असे मोदी म्हणाले.
 
६. १०० हून अधिक जलमार्गांवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीच्या कामामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, यामुळे भरपूर रोजगार निर्माण होतील.
 
मातीचे आरोग्य बिघडवण्याबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिसाद देण्यासाठी 'सेव्ह सॉईल मूव्हमेंट' हा जागतिक उपक्रम आहे.
 
  
 
 
Powered By Sangraha 9.0