"देवेंद्र फडणवीस हे उत्तम मुख्यमंत्री होते; यात दुमत नाही" - खा. सुनील तटकरे

04 Jun 2022 16:50:06

DF
 
 
 
 
पनवेल : महापालिकेच्या वतीने ‘स्वराज्य’ या महापालिकेच्या मुख्य प्रसासकीय इमारतीच्या बांधकामाच्या भुमीपूजनासह अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या सोहळ्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस हे उत्तम मुख्यमंत्री होते; यात दुमत नाही असे गौरवोद्गार काढले. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते. त्यावेळेस ती नगरपालिका महापालिका कोणत्या पक्षाकडे आहे याकडे लक्ष न देता त्यांनी वेळोवेळी निधीचे वितरण केले.
 
 
 
माझ्या रोहा नगरपालिकेला ही त्यांनी सातत्याने निधी देण्याचे काम केले अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, तसेच विविध योजनांचे भूमिपूजन त्याबरोबरच इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा (शुक्रवार, दि. ३) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहामध्ये झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.
 
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल ह्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री राम शिंदे, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, विराधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0