नाशिकचे सुरेश कपाडिया चमकवणार काश्मीरचे खोरे!

04 Jun 2022 18:18:54

jk
 
नाशिक: नाशिकचे उपक्रमशील असलेले सुरेश कपाडिया जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पवन ऊर्जा प्रक्लपाच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करणार आहेत. प्रकल्प पूर्ण होताच काश्मीरचे खोरे लखलखणार आहे. नागरिकांना होणार विद्युत पुरवठ्याचा त्रास लक्षात घेऊन कपाडिया यांनी पवन ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
संबंधित परिसर हा भारत- पाकिस्तानच्या चेकपोस्टवर आहे. या ठिकाणी विजेचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात असतो. परिसरात वसलेली छोटी छोटी गाव, नागरिक आदींना या समस्येचा त्रास होतो. सद्यस्थितीत या परिसरात डिझेलच्या माध्यमातून विद्यूत पुरवठा केला जातो. मात्र यासाठी लाखो लिटर डिझेलची आवश्यकता भासते. परिणामी खर्च मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे लवकरच या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
 
सदर ठिकाणी पवन ऊर्जा प्रक्लपासाठी अनुकूल परिस्थिती असून येथे नदी, हवा आदी संसाधने उपलब्ध असल्याने पवन ऊर्जा प्रकल्पाची संकल्पना यशस्वीरित्या राबविली जाऊ शकते, अशी माहिती सुरेश कपाडिया यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0